स्नेहपानानंतर तीन-चार
दिवस यथायोग्य पद्धतीने अभ्यंग-स्वेदन उपचारांनी योजना केल्यानंतर विरेचन
केले जाते. विरेचनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी अगदी हलका आहार घेतलेला
असावा लागतो. रात्री शांत आणि पूर्ण झोप झालेली अपेक्षित असते आणि सकाळी
उठल्यानंतर मुखमार्जन, स्नान, मलशुद्धीसुद्धा व्यवस्थित व्हावी लागते.
मुख्य कफकाल संपला की मग विरेचन द्यावे, असे शास्त्रात सांगितलेले आहे.
स्नेहपानानंतर तीन-चार दिवस पुन्हा यथायोग्य पद्धतीने अभ्यंग-स्वेदन उपचारांनी योजना केल्यानंतर येतो तो विरेचनाचा दिवस. विरेचनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी अगदी हलका आहार घेतलेला असावा लागतो. रात्री शांत आणि पूर्ण झोप झालेली अपेक्षित असते आणि सकाळी उठल्यानंतर मुखमार्जन, स्नान, मलशुद्धीसुद्धा व्यवस्थित व्हावी लागते. विरेचनाचे औषध अगोदरपासून तयार करून ठेवलेले असावे. ते प्यायला कधी द्यायचे याबद्दलही शास्त्रात मार्गदर्शन केलेले आहे.
श्लेष्मकाले गते ज्ञात्वा कोष्ठ सम्यक् विरेचयेत् ।...अष्टांगहृदय सूत्रस्थान
मुख्य कफकाल संपला की मग विरेचन द्यावे.
सकाळी सूर्योदयापासून पुढे चार तास कफदोषाचे आधिक्य असणारे असतात. त्यामुळे त्यातला सुरवातीचा कफाचा जोर ओसरला की साधारणतः आठ-सव्वाआठच्या सुमाराला विरेचन औषध देणे चांगले असते.
एक अनुभव असा, की एकेकट्याने स्वतंत्रपणे विरेचन औषध घेण्यापेक्षा ज्या सर्व मंडळींचे त्या दिवशी विरेचन असेल त्या सर्वांना एकत्र आणून सर्वांनी मिळून औषधाचा काढा, तेल वगैरे पिणे अधिक सोपे जाते. औषध घेताना मळमळ किंवा उलटी होऊ नये यासाठी मीठ लावलेला आल्याचा तुकडा, लवंग, वेलची वगैरे उपलब्ध असावी. औषधाचा वास निघून जावा यासाठी हवेचे संचरण व्यवस्थित होत असावे.
विरेचनाचे औषध घेतल्यानंतर गरम पाणी पिण्यास दिले जाते. यामुळे विरेचनाचा आवेग येण्यास मदत मिळते. शिवाय औषधाची कार्यकारिताही वाढते. म्हणूनच विरेचनाचे औषध घेतल्यानंतरही मधून मधून घोट-घोट गरम पाणी घेत राहणे चांगले असते. विरेचनाचे औषध घेतल्यावर पहिला आवेग कधी येईल याचा नियम असा नसतो. मात्र सहसा तीन तासांच्या आत विरेचनाची सुरवात होते, असा अनुभव आहे. एखाद्याला याहून विलंब झाला किंवा एक-दोन आवेग येऊन पुढील वेग येईनासे झाले, तर पोटावर गरम पाण्याच्या पिशवीने शेकता येते.
असे घडायला हवे योग्य विरेचनामध्ये सर्वप्रथम मल, त्यानंतर पित्त व शेवटी कफदोषाचे विसर्जन होणे अपेक्षित असते. याखेरीज योग्य विरेचनात पुढील लक्षणे दिसतात.
- शरीरात हलकेपणा येतो.
- सर्व इंद्रिये उत्साहित होतात, त्यांची आपापली कामे अधिक चांगल्या प्रकारे होऊ लागतात.
- वायू सरतो.
- अग्नी प्रदीप्त होतो.
- चित्तवृत्ती उल्हसित होतात.
- थोडासा थकवा जाणवला तरी आतून चांगले वाटू लागते. विरेचनाच्या आवेगांची संख्या ही प्रकृती, वय, रोगावस्थेवर अवलंबून असते. शिवाय, एका आवेगामध्ये किती मलशुद्धी झाली, हेसुद्धा प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे असू शकते. साधारणतः 10 वेग आल्यास शरीरशुद्धी बेताची, 20 वेग आल्यास मध्यम प्रकारची आणि 30 वेग आले तर उत्तम प्रकारची झाली असे समजले जाते. पण, फक्त या संख्येवर न जाता वर उल्लेखलेल्या इतर लक्षणांवरून विरेचन योग्य झाले की नाही हे पाहणे आवश्यक होय.
काही कारणाने विरेचनाच्या औषधाने आपले काम व्यवस्थित केले नाही व यायला हवेत तितके आवेग आले नाहीत, तर त्या दिवशी पुन्हा औषध देता येत नाही. कारण असे करण्याने विरेचनाचा अतियोग होण्याची शक्यता असते. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा विरेचनाचे औषध देता येते. दुसऱ्या दिवशीही यथोचित विरेचन झाले नाही, तर मात्र पुन्हा सुरवातीपासून अभ्यंग, स्नेहपान, स्वेदन वगैरे पूर्वकर्म करून विरेचनविधी करावा लागतो.
विरेचनामुळे फक्त पोटच साफ होते असे नाही, तर अगोदर केलेल्या स्नेहन-स्वेदन वगैरे पूर्वकर्माच्या योगे कोठ्यात येऊन राहिलेली प्रत्येक पेशीतील अशुद्धी पोटातील मळाच्या बरोबरीने शरीराच्या बाहेर जात असते आणि म्हणूनच विरेचनाचा प्रभाव संपूर्ण शरीरावर होत असतो. विशेषतः कांती उजळणे, चेहऱ्यावर थोडा थकवा जाणवला तरी एक प्रकारची स्फूर्ती व ताजेतवानेपण जाणवणे, पोटाचा घेर कमी होणे अशी लक्षणे विरेचनाच्या दिवशी लगेच जाणवतात. मात्र कधी कधी व्यक्तीला फार थकवा जाणवत असला तर साखर-मीठ-पाणी किंवा ग्लुकोजचे पाणी देण्याची आवश्यकता भासू शकते.
एखाद्या व्यक्तीला मूळव्याधीची प्रवृत्ती असेल तर विरेचनाच्या आवेगांनंतर गुदभागी जळजळ होऊ शकते. पूर्वी असलेले मोड सुजू शकतात. अशा वेळी त्या ठिकाणी विशेष धुपाची योजना करावी लागते. गुदभागी तूप लावण्याने किंवा कोरफडीचा गर ठेवण्यानेही बरे वाटते.
पथ्याचे खाणे विरेचन चालू असेपर्यंत सहसा भूक लागत नाही. पण आवेग येणे थांबले व विरेचन पूर्ण झाले की त्यानंतर पथ्याचे खाणे अतिशय महत्त्वाचे होय. या दृष्टीनेही आयुर्वेदात विस्तृत मार्गदर्शन केलेले आहे. शरीरशुद्धीनंतर आहारात जी काळजी घ्यायची ती "संसर्जन क्रम‘ या शब्दांत समजावली आहे. शरीरशुद्धीच्या प्रमाणानुसार संसर्जन क्रमही बदलतो. मात्र मध्यम स्वरूपाची शुद्धी झाल्यास आहाराची पुढीलप्रमाणे योजना केली जाते.
- विरेचनाच्या दिवशी संध्याकाळी व दुसऱ्या दिवशी दुपारी फक्त भाताची पेज घ्यावी.
- दुसऱ्या दिवशी संध्याकाळी व तिसऱ्या दिवशी दुपारी फक्त भात खावा.
- तिसऱ्या दिवशी संध्याकाळी व चौथ्या दिवशी दुपारी मुगाची खिचडी खावी.
- चौथ्या दिवशी संध्याकाळी मुगाचे सूप वगैरे घेऊन पाचव्या दिवशी दुपारी नेहमीचे जेवण घ्यायला हरकत नाही.
अर्थात हा सामान्य नियम असला तरी प्रत्येक व्यक्तीनुसार वैद्य यात आवश्यक तो बदल करू शकतात. चरकाचार्यांनी सांगितलेला हा क्रम आदर्श असला तरी पुढच्या काळातील संहितांमध्ये तो बदलावा लागलेला दिसतो. उदा. अष्टांगहृदयामध्ये टीकाकारांनी शरीरशुद्धी झाल्याच्या दिवशी फक्त लाह्या, दुसऱ्या दिवशी जुन्या तांदळाचा पथ्यकर भात आणि संध्याकाळी सूप देऊन तिसऱ्या दिवशी सामान्य आहार घ्यायला हरकत नाही असे सांगितले आहे. तेव्हा त्या त्या काळानुसार संसर्जन क्रमात थोडाफार बदल होत गेला आहे. वैद्यांनी स्वतः एकंदर व्यक्तीची प्रकृती, पचनशक्ती, मानसिकता पाहून संसर्जन क्रम निश्चित करणे व व्यक्तीने फक्त पथ्याचेच खाण्याकडे लक्ष ठेवणे सर्वांत महत्त्वाचे होय.
पित्ताचे पारिपत्य पंचकर्माबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. विशेषतः पंचकर्मामध्ये उपासमार होते आणि खाण्याचे हाल होतात ही कल्पना अनेकांच्या मनात घर करून राहिलेली दिसते. त्यातही एखाद्या व्यक्तीचे वजन कमी किंवा नॉर्मल असले तर तिला वजन घटेल तर काय होईल अशी चिंता वाटल्याशिवाय राहत नाही. मात्र, प्रत्यक्षात पंचकर्मामध्ये उपासमार करणेही गरजेचे नसते आणि अकारण वजनही घटत नाही. अशीच एक केस आठवते. 28 वर्षांची मुलगी होती. प्रकृतीवर पित्ताचा प्रभाव तर होताच, पण पित्ताचा त्रासही फार होता. जराही पोट रिकामे राहिले, जागरणे झाली, उन्हात जावे लागले किंवा तेलकट-आंबट पदार्थ खाण्यात आले तर डोके दुखणे, पित्ताच्या उलट्या होणे, पोटात दुखणे वगैरे त्रास सुरू व्हायचे. घरी लग्नाची बोलणी चालू असल्याने मुलीला लवकरात लवकर बरे व्हायचे होते. लग्नाच्या आधी थोडे वजनही वाढवायचे होते. संतुलनमध्ये येण्याआधी तिने आयुर्वेदिक औषधे घेऊन पाहिली होती; पण तरीही जरा अपथ्य घडले तरी त्रास होत होताच.
त्रासाची तीव्रता आणि स्वरूप पाहून ठरविले की पंचकर्म करून शरीरशुद्धी करून घेणे सर्वांत चांगले. भूक सहन न होणे हा मुलीचा मुख्य त्रास असल्याने तिच्या मनात पंचकर्म सोसवेल की नाही याची शंका होती. मात्र पंचकर्मादरम्यान दिवसातून चार वेळा पचायला हलके अन्न घ्यायचे असते आणि एरवीसुद्धा कधीही भूक लागली तर साळीच्या लाह्या खाता येतील असे सांगितले. व्यवस्थित स्नेहन, स्वेदन, घृतपान करून विरेचन केले. एक उलटी झाली आणि विरेचनाचे 16 आवेग आले. मुख्य म्हणजे पंचकर्मादरम्यान एकदाही पित्ताचा त्रास झाला नाही, डोके दुखले नाही. पंचकर्माच्या शेवटच्या दिवशी वजन केले तेव्हा ते तेवढेच असल्याचे समजले. सध्या मुलीची तब्येत व्यवस्थित आहे. आहार-आचरणात काय काळजी घ्यायला हवी हे समजल्याने तिला सध्या असा त्रास होत नाही.

No comments:
Post a Comment